कामाच्या ओझ्याखाली दबून जगणं विसरलेली कुटुंबं बघितल्यावर वाटतं की, यांना ‘पहेली’ सिनेमातल्याप्रमाणे एखाद्या भुताने येऊन प्रेमानं जगायला व एकमेकांना वेळ द्यायला शिकवावं

आम्ही एवढे केले म्हणून पुढच्या पिढीने एवढे काम करावे, असे म्हणणे बरोबर नाही. कारण प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीपेक्षा जास्त सोयीसुविधा व वेगळ्या प्रकारचे आव्हान झेलत असते. मुंबईमध्ये अति प्रदूषण झाल्याने नागरिकांवर आणि कामांवर सरकारने बंधनं आणली आहेत. तीच स्थिती दिल्लीची आहे. अति काम, मानवी हाव, आंधळी व्यापारी वृत्ती व निसर्गाला गृहीत धरणे, यामुळे ही वेळ आली आहे.......

बीबीसीने एका अहवालात करोना संपल्यावर मानसिक आरोग्याच्या समस्यांची त्युनामी येईल, असं म्हटलं होतं. ते दुर्दैवानं आता खरं ठरताना दिसू लागलं आहे…

आर्थिक स्तर हा मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. कुटुंबातील सर्वांच्या गरजा भागतील आणि भविष्याची तरतूद होईल, एवढी आर्थिक सुरक्षितता असल्यावर मानसिक आरोग्य चांगलं राहतं. भारताची ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या २५ वर्षांखालील आहे, आणि त्यातील ४१ टक्के बेरोजगार आहेत. भारतातील ८० कोटी लोकांचं महिन्याचं उत्पन्न फक्त ७५०० रुपये एवढंच आहे. अशा परिस्थितीत त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं कसं राहील.......

शोकावस्था ही नैसर्गिक, उत्स्फूर्त अशी सामान्य प्रतिक्रिया आहे. या कसोटी पाहणाऱ्या काळाकडे ‘शिकण्या’चा काळ म्हणून पहायला हवे

करोना काळात आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला. हॉलिवुडच्या चित्रपटात शोभावेत, असे चित्तथरारक प्रकार लोकांनी भोगले. त्यामुळे ‘PTSD’ आणि ‘PGD’चे परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाले. ही अवस्था अनुभवताना आपल्या मेंदूचे कार्य व त्याची रचना बदलते. ‘शोकावस्था’ अनुभवताना आपल्याला दुःख, निराशा, ताण, चिंता, भीती, अपराधीपणा अशा अनेक नकारात्मक भावनांचा काही महिने किंवा काही वर्षेसुद्धा सामना करावा लागतो.......

सर्वच वयोगटांत आक्रमकता व हिंसा याचं प्रमाण वाढलं आहे. परंतु वाढत्या वयातील मुलं-मुली यांच्यातलं गुन्ह्यांचं प्रमाण चिंताजनक आहे

संज्ञात्मक मज्जातंतूशात्रज्ञ डॉ. कॅरोलिन लीफ यांच्या मते ऑनलाइन असताना आपला मेंदू तार्किक विचार करू शकत नाही. सोशल मीडियावर तुम्ही काय बघता, यावरून तुमचा मेंदू प्रत्येक क्षणाला बदलतो. त्यामुळे त्याची काम करण्याची तऱ्हा बदलून जाते, तो गोंधळून जातो. १९७० सालच्या मेंदूच्या ब्रेन मॅपिंग प्रतिमा व इन्स्टाग्रामच्या काळातील ब्रेन मॅपिंग प्रतिमा यांत खूप फरक आहे. इन्स्टाग्राम काळात मेंदू वेड्यासारखं वागतोय.......

भारतात कामाच्या ठिकाणच्या मानसिक आरोग्यावर अजूनही पुरेसं शास्त्रोक्त पद्धतीचं काम झालेलं नाही. भारतीयांच्या अ-वैज्ञानिक दृष्टीकोनसुद्धा यासाठी कारणीभूत आहे

एसटी कामगारांचा संप असो किंवा इतर कोणताही संप, तो अत्यंत मुत्सद्देगिरीनं व शांत डोक्यानं हाताळण्याची गरज असते. पण हे भारतात बघायला मिळात नाही. कामाच्या ठिकाणी पोटापाण्याचा प्रश्न मुख्य असतो, तिथं तडकभडक भावना कामाला येत नाही. दया, सहसंवेदना व संवादकुशलता आवश्यक असते. मात्र भारतातील कामगार संघटना व कामगार हक्कासाठी काम करणारी मंडळी अजूनही ‘conflict resolution’चे जुनाट मार्ग वापरतात.......

‘झुंड’ हा सिनेमा फक्त एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नसून, सर्वच सामाजिक व आर्थिक वर्गातील लोकांचे डोळे उघडणारा आहे

‘झुंड’च्या शेवटी अमिताभ बच्चन यांनी न्यायालयातील प्रसंगामध्ये अत्यंत योग्य पद्धतीनं व नाटकी न होता झोपडपट्टीतील गरीब मुलांचे प्रश्न समाजासमोर आणले आहेत. अशा मुलांना सरसकट पापी, गुन्हेगार न ठरवता सहसंवेदना वापरून त्यांना समजून कसं घ्यावं, हे ‘झुंड’मधून शिकायला मिळतं. गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या व अभिनयाचा कोणताही अनुभव नसलेल्या कलाकारांनी काम केल्यानं ‘झुंड’ काळजाला भिडतो. कुठेही नाटकी वाटत नाही.......

व्यावसायिक भूमिका व व्यक्तिमत्त्वं यांच्या सरमिसळीमुळे अनेक जण ‘हायब्रीड’ झाले आहेत. त्यांच्यातील हाडामांसाची व्यक्ती कधी संपून चाणाक्ष व्यावसायिक भूमिका कधी सुरू होते, हे कळतही नाही

औद्योगिकीकरणानं आपल्या वाटेल्या आलेल्या व्यावसायिक भूमिका आपल्यावर हावी झाल्याचं दिसतं. कुठल्याही नात्यात आपण मुख्यत्वे करून आपलं काम, व्यावसायिक मूल्य दाखवून सुरुवात करतो. व्यावसायिक मूल्य कधीही बदलू शकतं. ते बदलतं तेव्हा आपल्याला त्रास होतो. व्यावसायिक भूमिका खूपच गंभीरपणे घेतल्यानं व्यक्ती म्हणून वाढ खुंटलेल्या, अति पैसा कमावूनही समाधानी नसलेली मंडळी बघितली की वाटतं, कशासाठी हा अट्टाहास?.......

आधीच्या काळात ‘थेरगाव क्वीन’सारखी तरुणाई गुन्हेगारीच्या मार्गाने जायची, आता ती इन्स्टाग्राम/फेसबुकसारख्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं समाजविघातक गोष्टी करताना दिसते

सोशल मीडियामुळे स्वतःविषयी भलते समज व दुसऱ्यांविषयी भलते गैरसमज निर्माण होतात. तुम्ही सोशल मीडियावर छायाचित्रं टाकली नाहीत, म्हणजे तुम्ही आयुष्य जगत नाही, असं आपल्या मेंदूचं कंडिशनिंग करण्यात सोशल मीडिया यशस्वी ठरला आहे. sexually desirable असण्याभोवतीच आपलं आयुष्य केंद्रित करून अत्यंत उथळ अशा व्यक्ती समाजात ‘हिरो’ ठरवल्या जात आहेत. थेरगाव क्वीन हे त्यातीलच एक ठळक उदाहरण.......

भारतीय नृत्यासाठी ‘भारतीय संस्कृती’ची जाण असणं आवश्यक आहे, वाचन चांगलं हवं आणि मेहनतीची तयारी हवी. ते सगळं माधुरीमध्ये आहे.

हिंदी सिनेसृष्टीत १९८८ साली ‘तेजाब’मध्ये एका मुंबईच्या मराठी मुलीनं ‘एक दो तीन’ करत जो धुमाकूळ घातला, तो ‘न भूतो न भविष्यति’ असा होता. त्या सिनेमाचा नायक जरी अनिल कपूर असला तरी ‘तेजाब’ माधुरी होती. तिनं रंगवलेलं पात्र वडिलांच्या शोषणाला बळी पडलेलं व स्टेजवर पैशासाठी काम करणारं असतं. माधुरीनं या भूमिकेत कमालीची तीव्रता दाखवली आहे. उत्कृष्ट हिंदी उच्चार हे या सिनेमातलं नवख्या माधुरीचं मोठं वैशिष्ट्य आहे.......

महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या परीक्षांमध्ये भावनिक व सामाजिक बुद्ध्यांक तपासले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे!

स्पर्धा परीक्षांच्या सर्व उमेदवारांना मानसशास्त्रीय कसोटीतून जावे लागते. त्यामुळे फक्त बौद्धिक पातळी नाही तर भावनिक पातळीसुद्धा तपासली जाते. एक संघ म्हणून वेगवेगळ्या स्तरातील लोकांशी वेगवेगळ्या परिस्थितीत काम करताना ते कसे वागतील, याची कल्पना येते. कारण बहुतेक कामांत भावनिक व सामाजिक बुद्ध्यांक उपयोगी ठरतो. सर्वसाधारण बुद्धिमत्ता, परंतु लोक हाताळण्याचे कौशल्य हेच सध्याच्या काळात यशाचे गणित आहे.......

सामाजिक वीण जोडणं आवश्यक आहे. नाहीतर ब्रिटन, जपान यांच्या धर्तीवर आपल्या देशातही जनतेतला एकटेपणा घालवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय आणि मंत्री नियुक्त करावे लागतील!

पैसा व त्यातून येणारा ऐशोआराम म्हणजे आनंद ही कल्पना भारतीय लोकांमध्ये एकटेपणा वाढण्यामागचा आणखी एक घटक आहे. आनंदी देशाच्या यादीत भारत अगदी शेवटच्या क्रमांकावर आहे. समृद्ध नाती हा आनंदी समाजाचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. आनंदी देशाच्या यादीत पहिल्या पाचमध्ये येणारे देश कामाला महत्त्व देणारे ‘नसून’ तिथं आनंद व समाधान ही कल्पना मध्यभागी ठेवून देशाची धोरणं आखली जातात.......